सुखी आणि बुद्धिमान माणसाची लक्षणे

*सुखी आणि बुद्धिमान माणसाची लक्षणे*

१) या लोकांना कधीही कोणत्या गोष्टीचा त्रास करून घेणे, वादविवाद करणे हे आवडत नाही. त्यांच्याविरुद्ध असणाऱ्या लोकांशी सुद्धा वाद घालण्यात त्यांना कसलाच रस नसतो.

२) मूर्ख माणसांशी भांडत असताना ते नेहमी समोरच्या माणसाला तुझंच बरोबर आहे आणि माझेच चुकले असे बोलून ते भांडणाचा विषय जितक्या होईल तितक्या लवकर मिटवण्याचा प्रयत्न करतात.

३) रागात असताना कोणतेही निर्णय घेत नाहीत किंवा कोणताही निर्णय पट्कन देत नाहीत. इतर लोकांच्या मतांशी यांना काहीही देणे घेणे नसते. 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' ही म्हण यांच्या स्वभावाशी अगदी तंतोतंत जुळते.

४) स्वता:ही हसतात आणि दुसऱ्यानाही हसवतात. यांच्या चेहर्‍यावर नेहमी शांतता असते, हसमुख स्वभावाचे असतात.

५) 'मी खूप हुशार आहे' असा बडेजाव हे लोक करत बसत नाहीत.

६) या व्यक्तींच्या जवळ मोहावर ताबा ठेवण्याची अफाट शक्ती असते.

७) बुद्धिमान, हुशार व्यक्तिना निरोगी राहायला आवडते व ते त्यासाठी निश्चयी असतात. अश्या व्यक्ती व्यसने करत नाहीत व ते आपल्या आहाराला खूप महत्व देतात.

८) आपण बुद्धिमान मनुष्य त्याला म्हणू शकतो, जो अति हुशार व अर्धवट माणसांना सांभाळून घेऊन पुढे चालत असतो.

९) चुका करणे शक्यतो टाळतात आणि चुकून जरी चुक झालीच तर ती लगेच मान्यही करतात.

१०) आपल्या साथीदाराला सुद्धा हे लोक सर्व गुपिते उघडपणे सांगत नाहीत. जी गोष्ट कामाची आहे तेवढीच सांगतात.

११) यांना एकटे वेळ घालवायला खूपच आवडते याउलट बुद्धिमान लोकांसोबत वेळ घालवायलाही आवडतो. आपल्या लोकांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमी पाठिंबा देतात.

१२) या प्रकारच्या व्यक्ती कोणत्याही गोष्टीवर सहसा डोळे झाकून विश्वास ठेवत नाहीत त्याची पूर्णपणे चौकशी करतात. आपल्या आयुष्यात सहजा-सहजी कुणालाही स्थान देत नाहीत आणि विश्वासू माणसांना नेहमी जपण्याचा प्रयत्न करतात.

१३) बुध्दिमान व्यक्तींची मैत्री अगदी बोटावर मोजता येईल इतक्याच लोकांबरोबर असते. त्यांचे मोजकेच मित्र-मैत्रीण असतात.

१४) समोरच्या व्यक्तीशी बोलताना नजरेला नजर भिडवून बोलतात. त्यांना बोलणाऱ्याच्या डोक्यात कोणते विचार चालू आहेत हे जाणून घ्यायचे असते.

१५) बुद्धिमान व्यक्ती ह्या उच्चकोटीच्या श्रोता असतात व त्यांना जी गोष्ट आवडते त्या विषयाबद्दल ते मन लावून ऐकतात.

१६) अशी माणसं कमी बोलतात, बोलण्यागोदर विचार करतात, उगीचच बडबड करणे, वारंवार एकाच विषयावर बोलणे, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे त्यांना अजिबात आवडत नाही.

१७) नेहमी वाचन करत असतात, वाचन करणे हा त्यांचा एक छंदच असतो, त्यांना वाचनाची खूप आवड असते. एखादा आवडीचा विषय त्यांच्या हाती वाचायला सापडला तर तो पूर्णपणे वाचल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.

१८) आयुष्यात जोखीम पत्करण्यास हे लोक नेहमी तत्पर असतात.

१९) बचत करून राहिलेली रक्कम खर्च करतात, ज्या वस्तूंची गरज नाही अशा वस्तूवर वायपट खर्च करत नाहीत.

तसं पाहायला गेलं तर ही सर्व सुखी माणसाचीही लक्षणं आहेत परंतु खासकरून मला तरी असं वाटतं की, सुखी माणूस आणि बुद्धिमान माणूस यात फरक तो काय? "जो सुखी आहे तो बुद्धिमान असतोच असतो आणि जो बुद्धिवान आहे तो सुखी असतोच.".

Comments

Popular posts from this blog

ज्यांना आपली किंमत नाही अशा व्यक्तीपासून दूर रहा.

पक्षी मरतांना कुठे जातात ?

इथे बलात्काराला सुद्धा धर्म असतो?