Posts

Showing posts from October, 2020

सॅल्युट

*सॅल्युट*  जेव्हां तो सुंदरनगरच्या रेल्वे स्टेशनवर उतरला तेव्हा घड्याळात बरोबर रात्रीचे साडेअकरा वाजले होते. सुंदरनगरहून मुंबईला जाणारी पहिली ट्रेन पहाटे पाच वाजता होती. याचाच अर्थ त्याच्याकडे त्याच्या कामासाठी मोजून साडेपाच तास होते. आणि त्याच्यासारख्या सराईत इसमासाठी तेवढे नक्कीच पुरेसे होते.        सुंदरनगर मधील उच्चभ्रू लोकांच्या आलीशान बंगल्यांच्या वस्तीचा अभ्यास त्याने नेटवरील गुगल मॅप वरून अगोदरच करून ठेवला होता.      रेल्वेस्टेशन बाहेरील पानाच्या ठेल्यावरून त्याने फोरस्क्वेअर घेतली आणि रुबाबात शिलगावली. पान स्टॉल जवळ उभे राहून तो टू व्हीलर पार्किंगचे निरीक्षण करत थांबला.      त्याचे व्यक्तिमत्त्व अत्यंत रुबाबदार होते. सहा फुटाचे व्यायामाने कमवलेले शरीर, गोरापान राजबिंडा चेहरा, ब्लॅक जीन्स, त्याच्यावर डार्क ब्लू कलर चा ओपन शर्ट, डोळ्याला गोल्डन फ्रेमचा अतिशय महागडा चष्मा. पायात अॅदिदासचे शुज, मनगटावर रोलेक्स चे घड्याळ आणि पाठीवर महागडी प्रवासी सॅक. जणू काही एखादा राजकुमारच.    ट्रेनमधून उतरलेले प्रवासी पार्किंग मधून आपापल्या टू व्हीलर्स घेऊन निघून गेले. अजूनही पार्किंगमध्ये दहा

हॅट्स ऑफ डिक्सन

आज तुम्हाला ‘नाईलाजापोटी’ लागलेल्या एका रंजक  शोधाची गोष्ट सांगतो.. ‘अर्ल डिक्सन’ नावाचा एक सामान्य चाकरमानी तरुण ‘जॉन्सन ॲंड जॉन्सन’ या बहुराष्ट्रीय कंपनीत इमानेइतबारे काम करत होता.. अगदी आपल्याकडं जसं ‘चाणाक्ष-कार्यतत्पर-गृहकर्तव्यदक्ष’ वगैरे निकष लावून वधुपरिक्षा घेतात तशी परिक्षा घेत याच दरम्यान त्याचं ‘जोसेफिन’नामक तरुणीशी लग्नही झालं.. पहिले काही गोड गुलाबी प्रेमळ दिवस पार पडले.. दोघांच्या छानपैकी ताराही जुळल्या.. सगळं काही स्वप्नवत चाललं होतं पण एक समस्या मात्र होती.. समस्या फार मोठी होती असं नव्हे पण ती रोजचीच झाल्यानं ‘डोकेदुखी’ बनली होती.. जोसेफिन स्वयंपाकघरात गेली रे गेली तिला जखम झालीच समजा.. टोमॅटो कापला लागला चाकू-दार बंद करायला गेली लागला खिळा-दुध गरम करायला गेली बसला चटका.. जोसेफिन प्रेमळ असली तरी अंमळ वेंधळी होती.. नोकरीसोबतच डिक्सनला घरात जोसेफिनच्या जखमा धुणं-कापसानं पुसणं-कापडी पट्टी बांधून ड्रेसिंग करणं हे बिनपगारी काम रोजचंच लागलं होतं.. प्रेमापोटी सगळं निभावलं जात असलं तरी ‘रोज मरे त्याला कोण रडे?’ आपण घरी असलो तर ठिके पण नसलो तर??काय करावं बुवा??? डिक्सन मोठ्या

कोरोना पॉझिटिव्ह

      कोरोना पाॅझिटिव्ह झाल्याच्या 15 दिवसांनंतर सुरेश चांगला ठणठणीत बरा झाला होता. सुरेशच्या  हातात कोरोना निगेटिव्ह चे रिपोर्ट्स  होते परंतु , त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता.त्याला हायसे वाटण्या ऐवजी तो खूप अस्वस्थ दिसत होता.त्याच्या मनात विचारांची उलथापालथ होत होती त्याला सतत अपराध्यासारखे वाटत होते.        गेल्या पंधरा दिवसात आईसोलेशन वॉर्ड ने त्याला बरेच काही शिकवले होते.एक छोटीशी अडगळीची खोली,जिच्यात फक्त एक पलंग.दुसरे मनोरंजनाचे काहीही साधन नाही. जिथे सुख दुःख व्यक्त करण्यासाठी आजूबाजूला कोणीही नाही, जेवणाचे ताट लांबूनच कुणी तरी सरकवून जाते, स्वतः चे काम स्वतः करायचे आणि एकटेपणा भोगायचा ...ह्या सगळ्या गोष्टी त्याला सतावत होत्या. काहीसे मनात ठरवल्यासारखे   त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो घरी आला.        बायको मुलांनी मोठ्या आनंदात प्रेमाने स्वागत केले.परंतु , घरात न जाता तो सरळ आई राहत असलेल्या अडगळीच्या खोलीकडे गेला .आणि आईचा हात धरून सरळ बाहेर आणले आणि बायको व मुलांसमोर तो आईला म्हणाला ,आजपासून तू आमच्या बरोबर इथे राहशील, इथे जेवशील, टी व्ही पण बघशील आता तू एकटी राहायचे

महाभारताचे "नऊ सार सूत्र".

 *महाभारताचे "नऊ सार सूत्र".*  *१) "जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल" - कौरव.*   *२) "तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील."- कर्ण.*  *३) "मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की, विद्येचा दुरुपयोग करीत स्वत:चा नाश करुन घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देईल."- अश्वत्थामा.*  *४) "कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल." - भीष्म पितामह.*  *५) "संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते" - दुर्योधन.*  *६) "विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते."- धृतराष्ट्र.*  *७) "मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे." - अर्जुन.*  *८) "प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही."- शक

सुखी आणि बुद्धिमान माणसाची लक्षणे

*सुखी आणि बुद्धिमान माणसाची लक्षणे* १) या लोकांना कधीही कोणत्या गोष्टीचा त्रास करून घेणे, वादविवाद करणे हे आवडत नाही. त्यांच्याविरुद्ध असणाऱ्या लोकांशी सुद्धा वाद घालण्यात त्यांना कसलाच रस नसतो. २) मूर्ख माणसांशी भांडत असताना ते नेहमी समोरच्या माणसाला तुझंच बरोबर आहे आणि माझेच चुकले असे बोलून ते भांडणाचा विषय जितक्या होईल तितक्या लवकर मिटवण्याचा प्रयत्न करतात. ३) रागात असताना कोणतेही निर्णय घेत नाहीत किंवा कोणताही निर्णय पट्कन देत नाहीत. इतर लोकांच्या मतांशी यांना काहीही देणे घेणे नसते. 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' ही म्हण यांच्या स्वभावाशी अगदी तंतोतंत जुळते. ४) स्वता:ही हसतात आणि दुसऱ्यानाही हसवतात. यांच्या चेहर्‍यावर नेहमी शांतता असते, हसमुख स्वभावाचे असतात. ५) 'मी खूप हुशार आहे' असा बडेजाव हे लोक करत बसत नाहीत. ६) या व्यक्तींच्या जवळ मोहावर ताबा ठेवण्याची अफाट शक्ती असते. ७) बुद्धिमान, हुशार व्यक्तिना निरोगी राहायला आवडते व ते त्यासाठी निश्चयी असतात. अश्या व्यक्ती व्यसने करत नाहीत व ते आपल्या आहाराला खूप महत्व देतात. ८) आपण बुद्धिमान मनुष्य त्याला म्हणू शकतो, जो

पक्षी मरतांना कुठे जातात ?

 पक्षी मरतांना कुठे जातात ? आजपर्यंत कधी एका पक्ष्याला पण झाडाखाली मरुन पडलाय किंवा अजुन  कुठे आमच्या Colonyच्या परिसरात मृतावस्थेत  पडलाय असे बघीतले नाही .  किंबहुना जगात कुठेही असा मृत पक्षी मिळालाय असे आढळत नाही.  हां.. एखाद्या मांजरीने मारुन निष्काळजी पणे सोडुन दिलेले अवशेष किंवा एखाद्या अपघातात चिरडलेले पक्षी बर्‍याच वेळा दिसले असतिल पण नैसर्गीक मेलेला पक्षी आजपर्यत तरी कुठेच आढळत नाही. मग पक्षी काय अमर असतात का ? की त्यांना नैसर्गिक मरण येतच नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे गुगल वर पण शोधायचा प्रयत्न केला. पण गुगलने पण काही तर्कशुध्द उत्तर दिले नाही.  अनेक पक्षी निरीक्षणांच्या साईट्स, पक्षीतज्ञांचे लेख सर्व काही शोधुन झाले पण कुठेही काही ठोस उत्तर मिळाले नाही. आणि मग ह्या प्रयत्नातच एक रंजक लेख वाचायला मिळाला "Dying pattern of Birds" ह्या लेखात काॅर्क बिशप ल्युसी  यांनी एक थोडी वादग्रस्त ठरु शकणारी थेअरी मांडलीय, लेखाची सुरवातच पक्षी मरण्यासाठी कुठे जातात अशी करुन बिशप ल्युसि ने सर्वांनाच  असे आव्हान दिलेय की कुणीही जगात नैसर्गिक मृत झालेल्या पक्षी पुरावा म्हणुन दाखवावा.  

वयाच्या 50 वर्षापुढील सर्वांनी खालील दहा कृती टाळाव्यात

 *वयाच्या 50 वर्षापुढील सर्वांनी खालील दहा कृती टाळाव्यात:* *1.  जीने चढू नका, गरजच असेल तर आधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे.* *2.  आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा.* *3.  आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा.* *4.  आपला पायजमा उभ्याने  न घालता बसून घाला.* *5.  झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका तर डाव्या अगर उजव्या कुशीवर वळून उठा.* *6.  उलटे चालू नका त्याने गंभीर इजा होऊ शकते.* *8.  खाली वाकून जड वस्तू उचलू नका तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला.* *9.  झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटे शांत बसून मग उठा.* *10.  संडासला जोर लावू नका नैसर्गिक होऊ द्या.          अजून महत्त्वाचे नेहमी कृतिशील रहा व सकारात्मक विचार ठेवा कारण आयुष्यभर काबाडकष्ट केल्यानंतर आता खरे जीवन आनंदी जगण्याची वेळ आहे.* *●  वरचेवर मित्रांच्या,  मैत्रीच्या संपर्कात जरूर रहा मनसोक्त पैसे वेळ खर्च करा* *●  आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल,  तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही.* *●  मग जीवनात खुप काटकसर कशा

Interview

 In a telephone interview, the radio announcer asked his guest, a millionaire, *"What made you happiest in life?"* The millionaire said: I have gone through four stages of happiness in life and finally I understood the meaning of true happiness. The first stage was to accumulate wealth and means. But at this stage I did not get the happiness I wanted.  Then came the second stage of collecting valuables and items. But I realized that the effect of this thing is also temporary and the luster of valuable things does not last long. Then came the third stage of getting big projects. Like buying a football team, buying a tourist resort, etc. But even here I did not get the happiness I had imagined.  The fourth time a friend of mine asked me to buy a wheelchair for some disabled children....... At a friend's request, I immediately bought a wheelchair. But the friend insisted that I go with him and hand over the wheelchairs to the children. I got ready and went with it. There I g

इथे बलात्काराला सुद्धा धर्म असतो?

 *इथे बलात्काराला सुद्धा धर्म असतो?*😡  *आता कंगना, अर्णब गप्प का?*                 पशु आणि हैवानालाही लाजवेल असे कृत्य भाजपच्या उत्तरप्रदेशात घडले आहे. लिंगपिसाटांनी कौर्याच्या सर्व सिमा पार केल्या. काही लिंगपिसाटांचे कौर्य माणूस विचार करु शकत नाही असे असते. भारतात दर मिनिटाला विविध गुन्हे घडत असतात. परंतु, प्रत्येक गुन्हा हा जात, वर्ग, धर्म, उच्च, निच पाहून त्याची वर्गवारी केली जाते. एका महिलेवर होणारा बलात्कार हा बलात्कारच असतो. पण, त्यातही माणूस वर्गवारी करतो हे तो स्वतः निचतेचे दर्शन घडवितो. *जिच्यावर बलात्कार होतो ती महिलाच असते, तिच्या यातना समान असतात, मग, दोन वेगवेगळ्या बलात्काराच्या घटनांना वेगळा न्याय का?* त्यात जात, धर्म शोधणे हे निचतेचेच लक्षण आहे. आणि अशावेळी टिवटिव बाई कंगना आणि बेंबीच्या देठापासून विनाकारण ओरडणारा तो अर्णब कुठे आहे? आता उत्तरप्रदेश सारखा राज्य "सेफ" आहे का? तिथे पोलिसांनी शुरतेचे काम केले आहे का? उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार का?                *उत्तरप्रदेशातील हाथरस येथे १४ सप्टेंबर २०२० ला मनीषा नावाच्या गरीब वाल्मीकी समाजाच्

नमस्कार

 म्हणून पाया पडायची पध्दत आहे. चागंली पध्दत‌आहे, पण कलियुगात वाईट घडते? ●● *नमस्काराचे महत्व* ●● ● *महाभारताचे युद्ध सुरु होते.*     *दररोज कौरवसेनेचे  मोठमोठे योद्धे*    *मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे*    *ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून*     *देखील त्यांच्या सेनेची सतत हानी*     *होत होती..* ● *एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर*     *व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन*     *भीष्म पितामह घोषणा करतात की..* ● *"मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन.."* ● *त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या*     *शिबिरात पोहोचताच पांडवांची*     *अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या*     *क्षमते बाबत सर्वांनाच कल्पना होती..* ● *तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल*     *झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या*     *लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले..*  ● *"माझ्या सोबत चल.."* ● *द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण*     *पितामहांच्या कक्षात पोहोचले.*     *ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर*     *उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की,*     *आत जाऊन पितामहांना प्रणाम कर..*   ● *सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने

ज्यांना आपली किंमत नाही अशा व्यक्तीपासून दूर रहा.

 मृत्यूपूर्वी वडिल आपल्या मुलाला म्हणाले, "माझ्या आजोबांनी मला दिलेले हे *घड्याळ* आहे. हे जवळजवळ *२०० वर्षे जुने* आहे. मी ते तुला देतो, तु *दागिन्यांच्या दुकानात* जा. त्यांना सांग की मला ते विकायचे आहे आणि ते आपल्याला किती ऑफर देतायत ते पहा. "मुलगा दागिन्याचा दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला, आणि म्हणाला, "त्यांनी *१५० रू* ऑफर केले कारण ते फारच जुने आहे."  वडिल म्हणाले, "आता *भंगाराच्या दुकानात* जा."  मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येवून म्हणाला, "त्यांनी *२० रू* अॉफर केले कारण ते खूप खराब आहे."वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन *संग्रहालयात* जायला सांगितलं.  तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला.  "बाबा, क्युरेटरने या दुर्मिळ तुकड्यास त्याच्या *मौल्यवान वस्तूंच्या संग्रहालयात* समाविष्ट करण्यासाठी *५ लाख* ची ऑफर दिली."  *वडिल शांतपणे स्मितहास्य* करत म्हणाले, मला तुला हेच सांगायचे होते की *योग्य ठिकाणीच* तुमच *योग्य मूल्य* आहे. स्वतःला *चूकीच्या जागी शोधू* नका आणि तुमचे *मूल्य* नसल्यास रागावू नका. ज्यांना आपले

आम्ही मध्यमवर्गीय

"आम्ही मध्यमवर्गीय" साधारण 20-25 वर्षा पूर्वी ' मध्यमवर्गीय ' ही जमात अस्तित्त्वात होती. तसं संपूर्ण भारतभर ती पसरली होती.. पण महाराष्ट्रात तिचा स्वतः चा असा 'ब्रँड ' होता. घरात एक कमावता पुरुष,दोन तीन भावंड, नवरा बायको, कुठे कुठे आजी आजोबा, क्वचित प्रसंगी भाचा-पुतण्या शिकायला अशी एकुण कुटुंबसंस्था होती...एक कमावता आणि खाणारी तोंड 5-6.. हे चित्र सगळीकडे सारखचं होत...काही ठिकाणी महिला वर्ग नोकरीसाठी बाहेर पडला होता.. पण आजच्या इतका नाही..म्हणूनच की काय घर, किचन ह्यावर स्त्री वर्गाची सत्ता होती,एकहाती सत्ता !! पण तिथलं तिचं स्वतःच एक गणित होतं, पक्क गणित..!!त्या वरच सगळे हिशोब जुळत होते.. अन्नाच्या बाबतीत,"पोटाला खा हवं तेवढं , पण नासधूस नको" असा शिरस्ता होता..माझी आजी नेहमी म्हणायची,"खावून माजावं, पण टाकून माजू नये.." कढी, डाळभाजी करायची त्या दिवशी वरण कमी लावायच,आंब्याचा रस असेल तर भाजी कमी लागते, रवी लावली की त्या ताकाची कढी करायची, त्या तुपाच्या भांड्यात दुसऱ्या दिवशी पोळ्या टाकायच्या... अशी साधी साधी समीकरण असायची.. घरातली माणसांची जेवणं

वर्ष 2020, कोरोना, नैराश्य, आत्महत्या, राहुल तेवतीया इनिंग*

 Such a positive outlook ..... Just felt like sharing..... Lovely article! 👇🏻👇🏻👇🏻 *वर्ष 2020, कोरोना, नैराश्य, आत्महत्या, राहुल तेवतीया इनिंग* २७ सप्टेंबर रोजी शारजा येथे किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात रात्री अंदाजे ११.३० वाजता, १६.३, सोळाव्या ओव्हर मधील तिसरा बॉल पडल्यावर हिंदी कमेंट्री करताना आकाश चोप्रा म्हणाला " इस वक्त आधा भारत राहुल तेवतिया को दोषी मान रहा होगा के ये मॅच उनके वजह से हार रहे हैं! वो जिता नहीं सकते. १६.४ ओव्हर  झाल्यावर आकाश चोप्रा पुन्हा म्हणाला, "सनी भाई मुझे आपसे एक बात पुछनी हैं अगर बल्लेबाज इतना स्ट्रगल कर रहा है तो उसे रिटायर्ड आउट क्यों नहीं घोषित कर देते! इसको इतना क्यों बुरा समजा जाता हैं!  अगर कोई बॉलर अच्छी बॉलिंग नही कर रहा है तो उसे अगले ओवर नही देते. वैसेही राहुल तेवतिया को राजस्थान रॉयल्स ने ही रिटायर्ड आउट देने में क्या दिक्कत हैं. ऑलरेडी तेवतिया को रॉबीन के पहले भेज कर रॉयल्स राजस्थानने गलती कर दी हैं!" १६.५ व्या बॉलला सुनील गावस्कर म्हणतात, "बहोत अच्छा सवाल है! हाँ ऐसा हो

शहाण्या माणसांचा क्लास

 *शहाण्या माणसांचा क्लास*  “अरे, पण गरज काय आहे याची?” हे वाक्य ज्यांना योग्यवेळी, योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीविषयी आणि योग्य व्यक्तीशी बोलताना वापरता येतं ना, ती माणसं शहाणी असतात. जपून वागतात, जपून जगतात आणि जगताना इतरांनाही जपतात.  ऊठसूठ हाॅटेलात जाऊन खाणार नाहीत, सतत बाहेरून पार्सल मागवणार नाहीत, सारखी खरेदीही करणार नाहीत. रेल्वे स्टेशन किंवा एसटी स्टॅन्डवर पहाटे साडेचार किंवा पाच वाजता एकटे उतरले तर अर्धा तास तिथंच थांबतील. भल्या पहाटे जाऊन घरच्यांच्या साखरझोपेचा विचका करणार नाहीत आणि दुप्पट-तिप्पट पैसेही खर्च करणार नाहीत. अर्धा तास थांबतील, बसेस सुरू झाल्या की शांतपणे घरी पोचतील. सकाळचा पहिला चहा घरीच घेतील, सात वाजता आलेला वर्तमानपत्राचा ताजा अंक वाचतील. अर्धा तास वाचवण्यासाठी जिवाचा आटापिटा करून तिप्पट पैसे खर्च करणार नाहीत. पण कुटुंब असेल, लहान बाळ असेल तर असं वागणार नाहीत. रिक्षा करतील, थोडीफार घासाघीस करतील, आणि घरी जातील. हे जगण्यातलं व्यावहारिक शहाणपण पिढ्यानपिढ्या रक्तात मुरलेला एक वर्ग आपल्या समाजात आहे. अनेकजण त्यांना मिडलक्लास म्हणतात, पण माझ्या लेखी ती खरी शहाणी माणसं

नसा-नसात निसर्ग प्रेम भरलेल्या अत्यंत साधा माणूसाची कहाणी

 नसा-नसात निसर्ग प्रेम भरलेल्या अत्यंत साधा माणूसाची कहाणी एकट्याने तब्बल एक कोटी झाडे लावणाऱ्या या अज्ञात हिरोची कहाणी प्रत्येकाने वाचायलाच हवी! अत्यंत साधा माणूस  ..या अवलीयाचं नाव आहे दरीपल्ली रामय्या. तेलंगणा राज्यातल्या ‘खंमम’ जिल्ह्यातला हा रहिवासी. फक्त त्याच्याच गावातल्या लोकांना त्याची ही करामत माहिती आहे. म्हणून काही लोक त्याला ‘चेटला रामय्या’ असे संबोधतात.. अत्यंत साधा माणूस.सायकलवर फेरी मारायची, त्यामुळे कसलाही खर्च नाही. बिया देण्याचं काम झाडेच करतात. फक्त साठवायच्या आणि वेळ मिळाला की पेरून यायच्या. हे मोठ्ठ काम ह्या व्यक्तीने हाती घेतलं पण कुठेही बोभाटा न करता.गावातल्या काही लोकांना ह्या माणसाच्या वेड्या छंदाची माहिती होती. काही लोक वेडा माणूस म्हणायचे रामय्याने खंमम जिल्ह्यातील एक कॅनॉल निवडला. चार किलोमीटरच्या परिसरात कॅनॉलच्या दोन्ही बाजूने अनेक वृक्षांची उभारणी केली.रामय्या नुसती झाडे लावून थांबत नाही तर, त्या झाडांची वाढ होईपर्यंत त्यांची काळजी स्वतः सायकलवर फिरून घेतो. एखाद्या लहान मुलाला वाढवावं तसं त्या रोपांना वाढवतो. मोठी झालेली झाडं काही दिवसांत मोठे वृक्षही हो

नकारात्मकता' कशी येते ते पहा

 *नकारात्मकता' कशी येते ते पहा.* मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी! काही मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक प्रयोग केला, एका नव्याकोऱ्या, अलिशान, चकचकीत आणि देखण्या हॉटेलचा शुभारंभ होता, आतुन बाहेरुन, ते हॉटेल अतिशय भव्यदिव्य आणि सुंदर होते. त्या हॉटेलच्या डिझाईनवर, बांधकामावर, डिझाईनवर, आणि तिथल्या फर्निचरवर पाण्यासारखा पैसा ओतण्यात आला होता. हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला हजारो लोकांना आमंत्रण दिले गेले होते. पण एक प्रयोग म्हणुन ह्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा वापर करण्याचे मानसशात्रज्ञांनी ठरवले. त्यांच्या सांगण्यावरुन हॉटेलच्या रिसेप्शन मध्ये पोहोचल्याबरोबर दिसणारी, अगदी समोरच्या भिंतीवर लावलेल्या सुंदर टाईल्सच्या डिझाईनमधली एक टाईल, मुद्दामहुन बाजुला काढुन ठेवण्यात आली.   आता एक वेगळीच गंमत सुरु झाली, हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक पाहुणा त्या हॉटेलचे सौंदर्य पाहुन हरखुन गेला खरा, पण आल्याबरोबर काही क्षणात त्याचे लक्ष मिसिंग टाईलकडेच वारंवार जाऊ लागले. शेकडो लोकांनी एकमेकांना ती मिसिंग टाईल दाखवली, त्याच्यावर चर्चा केली, ही ट

आणि म्हातारी अमर झाली सत्य घटनेवर आधारित

 *आणि म्हातारी अमर झाली सत्य घटनेवर आधारित*  रात्री बराच वेळ झाला होता. देवगडला जाणारी शेवटची बस वेळ होऊनही सुटत नव्हती. बस स्थानक तसे संपुर्ण रिकामे झाले होते. दोन चार प्रवाशी इकडे तिकडे रेंगाळत होते. या बसचे दहा बारा प्रवाशी मात्र तळमळ करीत होते की बस अजुन का सुटत नाही. तेवढयात एकाने निरोप आणला की बसचे एक चाक पंक्चर आहे. तो काढला की गाडी सुटेल. बरोबर दहा वाजता बस निघाली. जवळ जवळ सर्वच प्रवाशी देवगडला जाणारे होते. एका हातात बोचके धरुन बसलेल्या म्हातारी जवळ मात्र जेव्हा वाहक तिकिट फाडण्यास आला तेव्हा रस्त्यावर कातवन फाटा असलेल्या व तेथुन तीन चार किलोमिटर दूर असलेल्या गावाचे तिकिट मागु लागली. बस वाहक विचारात पडला. या म्हातारीचे वय झालेले, एकटीच उतरणारी, पावसाळ्याची गर्द अंधारी रात्र ही म्हातारी घरी कशी पोहचेल?  तो थोडासा म्हातारीवर रागावलाच की, 'तु एकटी, तुला नीट दिसत नाही, चालता येत नाही, एवढा उशीर का केला ? लवकर उजेडात निघुन जायचे ना ?' म्हातारीला नीट ऐकु पण येत नव्हते. काही तरी उत्तर तीने दिले. वाहकाने तिला त्या गावाचे तिकिट दिले व आपल्या स्थानावर येवुन बसला. इतर प्रवाशी पेंग

ती छडी हारवलीय

 *ती छडी हरवलीय.....* *...(प्रा. प्रवीण दवणे)*      पालकसभा संपली. मुलाच्या बाईंना प्रत्यक्ष भेटून म्हटलं; गृहपाठ केला नाही वा वर्गात काहीही आगळीक केली तरी त्याला व्यवस्थित शिक्षा करा."      "कमाल आहे. अहो, साधी एक पट्टी मारली तरी दुसर्‍या दिवशी पालक प्रिन्सिपाॅलना भेटतात. आम्हाला समज दिली जाते. तुम्ही तर शिक्षा करा असं सांगताय !"     *"योग्य वेळी योग्य शिक्षा हा सुध्दा शिक्षणातला भाग आहे असं मला वाटतं. शिक्षकांबद्दल प्रेमाबरोबर धाकही वाटायला हवा."*        मला विद्यालयाच्या पहिलीच्या वर्गातली माझी पहिली शिक्षा आठवली. हिशेबाचं उत्तर चोरुन लिहिल्याबद्दल बाईंनी केलेली. वर्गाबाहेर पायाचे अंगठे धरुन तासभर उभं केलं होतं त्यांनी. अश्रूंची धार लागली होती. शिक्षा संपली  न् जवळ घेऊन, थोपटून त्या म्हणाल्या, "अरे, आता हिशेबच काय, कुठलीही चोरी तुझ्या हातून होणार नाही."         हे आठवलं न् हसू आलं        ' शिक्षा ' याचा अर्थ फक्त मारहाण, उपासमार, तणावपूर्ण अबोला असा नाही. शिक्षेचे रुपरंगही बदलत जातात. *मुळात शिक्षा करणार्‍यामध्ये नैतिकतेचं अधिष्ठान असावं ला