इथे बलात्काराला सुद्धा धर्म असतो?

 *इथे बलात्काराला सुद्धा धर्म असतो?*😡 


*आता कंगना, अर्णब गप्प का?* 


               पशु आणि हैवानालाही लाजवेल असे कृत्य भाजपच्या उत्तरप्रदेशात घडले आहे. लिंगपिसाटांनी कौर्याच्या सर्व सिमा पार केल्या. काही लिंगपिसाटांचे कौर्य माणूस विचार करु शकत नाही असे असते. भारतात दर मिनिटाला विविध गुन्हे घडत असतात. परंतु, प्रत्येक गुन्हा हा जात, वर्ग, धर्म, उच्च, निच पाहून त्याची वर्गवारी केली जाते. एका महिलेवर होणारा बलात्कार हा बलात्कारच असतो. पण, त्यातही माणूस वर्गवारी करतो हे तो स्वतः निचतेचे दर्शन घडवितो. *जिच्यावर बलात्कार होतो ती महिलाच असते, तिच्या यातना समान असतात, मग, दोन वेगवेगळ्या बलात्काराच्या घटनांना वेगळा न्याय का?* त्यात जात, धर्म शोधणे हे निचतेचेच लक्षण आहे. आणि अशावेळी टिवटिव बाई कंगना आणि बेंबीच्या देठापासून विनाकारण ओरडणारा तो अर्णब कुठे आहे? आता उत्तरप्रदेश सारखा राज्य "सेफ" आहे का? तिथे पोलिसांनी शुरतेचे काम केले आहे का? उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार का?


               *उत्तरप्रदेशातील हाथरस येथे १४ सप्टेंबर २०२० ला मनीषा नावाच्या गरीब वाल्मीकी समाजाच्या १९ वर्षाच्या मुलीला तिच्या आईसमोर शेतातून उचलून नेले आणि चार नराधमांनी तिच्यावर पाशवी बलात्कार केला. ते निच कृत्य केल्यानंतर त्यांनी तिची जीभ कापली, तिच्या हड्ड्या तोडल्या, मणका आणि मानेवर घाव घातला आणि अशा क्रूरपणे  मारल्यानंतर तिला तिथेच सोडून गेले.* त्या दुर्दैवी मुलीचा दिल्ली येथे रूग्णालयात मृत्यू झाला. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडल्यानंतर उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी त्या मुलीचा जबरदस्तीने अंत्यविधी उरकला. घरचे लोकं विरोध करतील म्हणून त्यांना एका खोलीत डांबण्यात आले. बंदुकीच्या जोरावर सर्व पुरावे नष्ट करण्यात आले. रात्रीच्या वेळी ज्या ठिकाणी प्रेत जाळण्यात आले त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेऊन तिथे जाण्यास सर्वांनाच मनाई करण्यात आली. तिथे काय जाळले आहे हे सांगण्यास पोलिस तयार नव्हते. इथे पलिसांकडून कायद्याचा गैरवापर  झाला नाही का?


               अशाही परिस्थितीत मनिषाने मृत्यू पुर्वी सर्व माहिती पोलिसांना दिली होती. तरीही पोलिसांनी जबरदस्तीने अंत्यविधी उरकणे गरजेचे होते का? *इथे महाराष्ट्रात एक नशेबाज नटाने आत्महत्या केली. तेंव्हा भाजपसह कित्येकांनी थयथयाट केला. राज्य सरकारवर त्याच्या आत्महत्तेचे खापर फोडले. राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली.* हल्ली प्रत्येक घडामोडींवर टिव टिव करणारी ती नाची कंगना आता ट्विट करायला विसरली का? तिला आता भिती वाटत नाही का? तो भडवा अर्णब गोस्वामी नाहक किती जोरजोरात ओरडतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून अपमान करतो. आव्हानाची भाषा करतो. आता त्याची वाचा गेली का? योगी सरकार आणि तेथील पोलिसांना प्रश्न विचारण्याची याची हिंम्मत आहे का? *ज्यांना ज्यांना महाराष्ट्र असुरक्षित वाटत होते ते आता बोलायचे सोडुन कुठल्या बिळात लपले आहेत. धर्माच्या ठेकेदारांनो आता या ना मैदानात. एका गरीब मुलीला न्याय मिळवून द्या. उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी करा.* महाराष्ट्रात साधूंची हत्या झाल्यावर सर्व भाजपशासित राज्ये महाराष्ट्रावर तुटून पडली. मात्र, हीच घटना उत्तरप्रदेशात घडल्यावर सर्वांची हाताची घडी आणि तोंडावर बोट. महाराष्ट्रात हत्या आणि मग उत्तरप्रदेशात काय? 


               देशात रोजच हत्या, आत्महत्या, बलात्कार होत असतात.  *मात्र जात, पात, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत पाहून मेणबत्त्या पेटविल्या जातात. दिल्लीत निर्भयावर झालेला  बलात्कार आणि उत्तरप्रदेशात मनिषावर झालेला बलात्कार. वेगवेगळा कसा असू शकतो??* आता लोकांच्या संवेदना कुठे गेल्या. आता दुकानातल्या मेणबत्त्या संपल्या का? आता निषेध करण्याची शाई सुकली का? ट्विट करण्याचे बटन खराब झाले का? मिडियाचे डिबेट कुठे गेले? भिती वाटणाऱ्यांची भिती नाहीशी झाली का? *या भारत देशातच बलात्काराला जात, धर्म असतो. बलात्कार झालेली ही महिला नसून ती कोणत्या जातीची आहे हे पाहीले जाते. किती ही दुर्दैवी गोष्ट आहे.* मनीषा या गरीब मुलीवर झालेल्या बलात्काराचा मी तिव्र शब्दार जाहिर निषेध करतो! 

⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫

Comments

Popular posts from this blog

नमस्कार

वर्ष 2020, कोरोना, नैराश्य, आत्महत्या, राहुल तेवतीया इनिंग*

शहाण्या माणसांचा क्लास