ज्यांना आपली किंमत नाही अशा व्यक्तीपासून दूर रहा.

 मृत्यूपूर्वी वडिल आपल्या मुलाला म्हणाले, "माझ्या आजोबांनी मला दिलेले हे *घड्याळ* आहे. हे जवळजवळ *२०० वर्षे जुने* आहे. मी ते तुला देतो, तु *दागिन्यांच्या दुकानात* जा. त्यांना सांग की मला ते विकायचे आहे आणि ते आपल्याला किती ऑफर देतायत ते पहा. "मुलगा दागिन्याचा दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला, आणि म्हणाला, "त्यांनी *१५० रू* ऑफर केले कारण ते फारच जुने आहे."  वडिल म्हणाले, "आता *भंगाराच्या दुकानात* जा."  मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येवून म्हणाला, "त्यांनी *२० रू* अॉफर केले कारण ते खूप खराब आहे."वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन *संग्रहालयात* जायला सांगितलं.  तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला.  "बाबा, क्युरेटरने या दुर्मिळ तुकड्यास त्याच्या *मौल्यवान वस्तूंच्या संग्रहालयात* समाविष्ट करण्यासाठी *५ लाख* ची ऑफर दिली."  *वडिल शांतपणे स्मितहास्य* करत म्हणाले, मला तुला हेच सांगायचे होते की *योग्य ठिकाणीच* तुमच *योग्य मूल्य* आहे. स्वतःला *चूकीच्या जागी शोधू* नका आणि तुमचे *मूल्य* नसल्यास रागावू नका. ज्यांना आपले *मूल्य* माहित आहे तेच आपली प्रशंसा करतात.आपली *किंमत जाणून घ्या* म्हणजे अशा व्यक्ती पासून दुर रहा ज्याना आपली *किंमत नाही*....! सर्व 

 मित्रांना समर्पित.             🙏🙏👍👍

Comments

Popular posts from this blog

नमस्कार

वर्ष 2020, कोरोना, नैराश्य, आत्महत्या, राहुल तेवतीया इनिंग*

शहाण्या माणसांचा क्लास