कोरोना पॉझिटिव्ह

      कोरोना पाॅझिटिव्ह झाल्याच्या 15 दिवसांनंतर सुरेश चांगला ठणठणीत बरा झाला होता. सुरेशच्या  हातात कोरोना निगेटिव्ह चे रिपोर्ट्स  होते परंतु , त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता.त्याला हायसे वाटण्या ऐवजी तो खूप अस्वस्थ दिसत होता.त्याच्या मनात विचारांची उलथापालथ होत होती त्याला सतत अपराध्यासारखे वाटत होते.
       गेल्या पंधरा दिवसात आईसोलेशन वॉर्ड ने त्याला बरेच काही शिकवले होते.एक छोटीशी अडगळीची खोली,जिच्यात फक्त एक पलंग.दुसरे मनोरंजनाचे काहीही साधन नाही.
जिथे सुख दुःख व्यक्त करण्यासाठी आजूबाजूला कोणीही नाही, जेवणाचे ताट लांबूनच कुणी तरी सरकवून जाते, स्वतः चे काम स्वतः करायचे आणि एकटेपणा भोगायचा ...ह्या सगळ्या गोष्टी त्याला सतावत होत्या. काहीसे मनात ठरवल्यासारखे   त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो घरी आला.
       बायको मुलांनी मोठ्या आनंदात प्रेमाने स्वागत केले.परंतु , घरात न जाता तो सरळ आई राहत असलेल्या अडगळीच्या खोलीकडे गेला .आणि आईचा हात धरून सरळ बाहेर आणले आणि बायको व मुलांसमोर तो आईला म्हणाला ,आजपासून तू आमच्या बरोबर इथे राहशील, इथे जेवशील, टी व्ही पण बघशील आता तू एकटी राहायचे नाही."
       *मुलाचे हे शब्द ऐकुन, भरून आलेले डोळे पुसता पुसता आई म्हणाली," अरे वा ! हा कोरोना तर पॉझिटिव्ह निघाला."*

Comments

Popular posts from this blog

ज्यांना आपली किंमत नाही अशा व्यक्तीपासून दूर रहा.

पक्षी मरतांना कुठे जातात ?

इथे बलात्काराला सुद्धा धर्म असतो?