Posts

सॅल्युट

*सॅल्युट*  जेव्हां तो सुंदरनगरच्या रेल्वे स्टेशनवर उतरला तेव्हा घड्याळात बरोबर रात्रीचे साडेअकरा वाजले होते. सुंदरनगरहून मुंबईला जाणारी पहिली ट्रेन पहाटे पाच वाजता होती. याचाच अर्थ त्याच्याकडे त्याच्या कामासाठी मोजून साडेपाच तास होते. आणि त्याच्यासारख्या सराईत इसमासाठी तेवढे नक्कीच पुरेसे होते.        सुंदरनगर मधील उच्चभ्रू लोकांच्या आलीशान बंगल्यांच्या वस्तीचा अभ्यास त्याने नेटवरील गुगल मॅप वरून अगोदरच करून ठेवला होता.      रेल्वेस्टेशन बाहेरील पानाच्या ठेल्यावरून त्याने फोरस्क्वेअर घेतली आणि रुबाबात शिलगावली. पान स्टॉल जवळ उभे राहून तो टू व्हीलर पार्किंगचे निरीक्षण करत थांबला.      त्याचे व्यक्तिमत्त्व अत्यंत रुबाबदार होते. सहा फुटाचे व्यायामाने कमवलेले शरीर, गोरापान राजबिंडा चेहरा, ब्लॅक जीन्स, त्याच्यावर डार्क ब्लू कलर चा ओपन शर्ट, डोळ्याला गोल्डन फ्रेमचा अतिशय महागडा चष्मा. पायात अॅदिदासचे शुज, मनगटावर रोलेक्स चे घड्याळ आणि पाठीवर महागडी प्रवासी सॅक. जणू काही एखादा राजकुमारच.    ट्रेनमधून उतरलेले प्रवासी पार्किंग मधून आपापल्या टू व्हीलर्स घेऊन निघून गेले. अजूनही पार्किंगमध्ये दहा

हॅट्स ऑफ डिक्सन

आज तुम्हाला ‘नाईलाजापोटी’ लागलेल्या एका रंजक  शोधाची गोष्ट सांगतो.. ‘अर्ल डिक्सन’ नावाचा एक सामान्य चाकरमानी तरुण ‘जॉन्सन ॲंड जॉन्सन’ या बहुराष्ट्रीय कंपनीत इमानेइतबारे काम करत होता.. अगदी आपल्याकडं जसं ‘चाणाक्ष-कार्यतत्पर-गृहकर्तव्यदक्ष’ वगैरे निकष लावून वधुपरिक्षा घेतात तशी परिक्षा घेत याच दरम्यान त्याचं ‘जोसेफिन’नामक तरुणीशी लग्नही झालं.. पहिले काही गोड गुलाबी प्रेमळ दिवस पार पडले.. दोघांच्या छानपैकी ताराही जुळल्या.. सगळं काही स्वप्नवत चाललं होतं पण एक समस्या मात्र होती.. समस्या फार मोठी होती असं नव्हे पण ती रोजचीच झाल्यानं ‘डोकेदुखी’ बनली होती.. जोसेफिन स्वयंपाकघरात गेली रे गेली तिला जखम झालीच समजा.. टोमॅटो कापला लागला चाकू-दार बंद करायला गेली लागला खिळा-दुध गरम करायला गेली बसला चटका.. जोसेफिन प्रेमळ असली तरी अंमळ वेंधळी होती.. नोकरीसोबतच डिक्सनला घरात जोसेफिनच्या जखमा धुणं-कापसानं पुसणं-कापडी पट्टी बांधून ड्रेसिंग करणं हे बिनपगारी काम रोजचंच लागलं होतं.. प्रेमापोटी सगळं निभावलं जात असलं तरी ‘रोज मरे त्याला कोण रडे?’ आपण घरी असलो तर ठिके पण नसलो तर??काय करावं बुवा??? डिक्सन मोठ्या

कोरोना पॉझिटिव्ह

      कोरोना पाॅझिटिव्ह झाल्याच्या 15 दिवसांनंतर सुरेश चांगला ठणठणीत बरा झाला होता. सुरेशच्या  हातात कोरोना निगेटिव्ह चे रिपोर्ट्स  होते परंतु , त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता.त्याला हायसे वाटण्या ऐवजी तो खूप अस्वस्थ दिसत होता.त्याच्या मनात विचारांची उलथापालथ होत होती त्याला सतत अपराध्यासारखे वाटत होते.        गेल्या पंधरा दिवसात आईसोलेशन वॉर्ड ने त्याला बरेच काही शिकवले होते.एक छोटीशी अडगळीची खोली,जिच्यात फक्त एक पलंग.दुसरे मनोरंजनाचे काहीही साधन नाही. जिथे सुख दुःख व्यक्त करण्यासाठी आजूबाजूला कोणीही नाही, जेवणाचे ताट लांबूनच कुणी तरी सरकवून जाते, स्वतः चे काम स्वतः करायचे आणि एकटेपणा भोगायचा ...ह्या सगळ्या गोष्टी त्याला सतावत होत्या. काहीसे मनात ठरवल्यासारखे   त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो घरी आला.        बायको मुलांनी मोठ्या आनंदात प्रेमाने स्वागत केले.परंतु , घरात न जाता तो सरळ आई राहत असलेल्या अडगळीच्या खोलीकडे गेला .आणि आईचा हात धरून सरळ बाहेर आणले आणि बायको व मुलांसमोर तो आईला म्हणाला ,आजपासून तू आमच्या बरोबर इथे राहशील, इथे जेवशील, टी व्ही पण बघशील आता तू एकटी राहायचे

महाभारताचे "नऊ सार सूत्र".

 *महाभारताचे "नऊ सार सूत्र".*  *१) "जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल" - कौरव.*   *२) "तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील."- कर्ण.*  *३) "मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की, विद्येचा दुरुपयोग करीत स्वत:चा नाश करुन घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देईल."- अश्वत्थामा.*  *४) "कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल." - भीष्म पितामह.*  *५) "संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते" - दुर्योधन.*  *६) "विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते."- धृतराष्ट्र.*  *७) "मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे." - अर्जुन.*  *८) "प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही."- शक

सुखी आणि बुद्धिमान माणसाची लक्षणे

*सुखी आणि बुद्धिमान माणसाची लक्षणे* १) या लोकांना कधीही कोणत्या गोष्टीचा त्रास करून घेणे, वादविवाद करणे हे आवडत नाही. त्यांच्याविरुद्ध असणाऱ्या लोकांशी सुद्धा वाद घालण्यात त्यांना कसलाच रस नसतो. २) मूर्ख माणसांशी भांडत असताना ते नेहमी समोरच्या माणसाला तुझंच बरोबर आहे आणि माझेच चुकले असे बोलून ते भांडणाचा विषय जितक्या होईल तितक्या लवकर मिटवण्याचा प्रयत्न करतात. ३) रागात असताना कोणतेही निर्णय घेत नाहीत किंवा कोणताही निर्णय पट्कन देत नाहीत. इतर लोकांच्या मतांशी यांना काहीही देणे घेणे नसते. 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' ही म्हण यांच्या स्वभावाशी अगदी तंतोतंत जुळते. ४) स्वता:ही हसतात आणि दुसऱ्यानाही हसवतात. यांच्या चेहर्‍यावर नेहमी शांतता असते, हसमुख स्वभावाचे असतात. ५) 'मी खूप हुशार आहे' असा बडेजाव हे लोक करत बसत नाहीत. ६) या व्यक्तींच्या जवळ मोहावर ताबा ठेवण्याची अफाट शक्ती असते. ७) बुद्धिमान, हुशार व्यक्तिना निरोगी राहायला आवडते व ते त्यासाठी निश्चयी असतात. अश्या व्यक्ती व्यसने करत नाहीत व ते आपल्या आहाराला खूप महत्व देतात. ८) आपण बुद्धिमान मनुष्य त्याला म्हणू शकतो, जो

पक्षी मरतांना कुठे जातात ?

 पक्षी मरतांना कुठे जातात ? आजपर्यंत कधी एका पक्ष्याला पण झाडाखाली मरुन पडलाय किंवा अजुन  कुठे आमच्या Colonyच्या परिसरात मृतावस्थेत  पडलाय असे बघीतले नाही .  किंबहुना जगात कुठेही असा मृत पक्षी मिळालाय असे आढळत नाही.  हां.. एखाद्या मांजरीने मारुन निष्काळजी पणे सोडुन दिलेले अवशेष किंवा एखाद्या अपघातात चिरडलेले पक्षी बर्‍याच वेळा दिसले असतिल पण नैसर्गीक मेलेला पक्षी आजपर्यत तरी कुठेच आढळत नाही. मग पक्षी काय अमर असतात का ? की त्यांना नैसर्गिक मरण येतच नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे गुगल वर पण शोधायचा प्रयत्न केला. पण गुगलने पण काही तर्कशुध्द उत्तर दिले नाही.  अनेक पक्षी निरीक्षणांच्या साईट्स, पक्षीतज्ञांचे लेख सर्व काही शोधुन झाले पण कुठेही काही ठोस उत्तर मिळाले नाही. आणि मग ह्या प्रयत्नातच एक रंजक लेख वाचायला मिळाला "Dying pattern of Birds" ह्या लेखात काॅर्क बिशप ल्युसी  यांनी एक थोडी वादग्रस्त ठरु शकणारी थेअरी मांडलीय, लेखाची सुरवातच पक्षी मरण्यासाठी कुठे जातात अशी करुन बिशप ल्युसि ने सर्वांनाच  असे आव्हान दिलेय की कुणीही जगात नैसर्गिक मृत झालेल्या पक्षी पुरावा म्हणुन दाखवावा.  

वयाच्या 50 वर्षापुढील सर्वांनी खालील दहा कृती टाळाव्यात

 *वयाच्या 50 वर्षापुढील सर्वांनी खालील दहा कृती टाळाव्यात:* *1.  जीने चढू नका, गरजच असेल तर आधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे.* *2.  आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा.* *3.  आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा.* *4.  आपला पायजमा उभ्याने  न घालता बसून घाला.* *5.  झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका तर डाव्या अगर उजव्या कुशीवर वळून उठा.* *6.  उलटे चालू नका त्याने गंभीर इजा होऊ शकते.* *8.  खाली वाकून जड वस्तू उचलू नका तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला.* *9.  झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटे शांत बसून मग उठा.* *10.  संडासला जोर लावू नका नैसर्गिक होऊ द्या.          अजून महत्त्वाचे नेहमी कृतिशील रहा व सकारात्मक विचार ठेवा कारण आयुष्यभर काबाडकष्ट केल्यानंतर आता खरे जीवन आनंदी जगण्याची वेळ आहे.* *●  वरचेवर मित्रांच्या,  मैत्रीच्या संपर्कात जरूर रहा मनसोक्त पैसे वेळ खर्च करा* *●  आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल,  तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही.* *●  मग जीवनात खुप काटकसर कशा